◆ माझी ओळख 

डॉ. सुभाष राठोड (जन्म - १ जून १९७७) हे एक मराठी लेखक, गोर-बंजारा संस्कृतीचे अभ्यासक असून त्यांचा जन्म तांडयात वास्तव्यास असलेल्या गोर-बंजारा कुटुंबात झाला. त्यांचे बालपण बंजारा तांड्यावर गेले. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण नायगाव,मंठा (जि.जालना) व औरंगाबाद येथे झाले. 

  डॉ.सुभाष राठोड यांनी गोर-बंजारा लोकसंस्कृती, गोर-बंजारा लोकसाहित्य , गोर बंजारा समाजाची बोलीभाषा -'गोरबोली', गोर बंजारा समाजातील मौखिक वाड्.मय, बंजारा समाजाचा इतिहास व शिक्षणशास्त्रातील काही विषयांवर शैक्षणिक व क्रमिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे 'बंजारा समाज : गोरबोली व मौखिक वाड्.मय', 'सामाजिक शास्त्र : अध्ययन-अध्यापनशास्त्र', 'Pedagogy Of Social Science' आदी ग्रंथ प्रकाशित असून त्यांना शिक्षणरत्न, राष्ट्रीय विद्या सरस्वती पुरस्कार, लाईफ टाईम अॅचिव्हमेंट अॅवार्ड आदी पुरस्कार मिळाले आहेत. 

  स्वत: समाजकार्यात राहून त्यांनी उपेक्षित व तितकाच दुर्लक्षित राहिलेल्या बंजारा समाजाच्या विविध सांस्कृतिक पैलूंवर व सामाजिक समस्यांवर आपल्या ग्रंथांतून अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, वसंतराव नाईक,म.जोतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या विचारांवर दिसून येतो

  उल्लेखनीय कार्य : अभ्यास गट सदस्य, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ, पुणेे, अभ्यास गट सदस्य, महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील विविध परिषदा , चर्चासत्रे , ' थिंक टँक 'यांमध्ये विविध विषयांवर शोधनिबंध सादर , विविध वृत्तपत्रे व मासिके इत्यादींमधून लेखन प्रकाशित, राष्ट्रीय व राज्यस्तरावरील विविध पुरस्कार व सन्मान.

Share